वांद्रे येथे दोघे बुडाले; एक मृतदेह हाती, एकाचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

वांद्रे येथे गुरुवारी रात्री समुद्रावर फिरायला गेलेले दोघे जण बुडाले. यातील एकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी हाती लागला तर दुसऱ्याचा शोध अजून सुरू आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.

वांद्रे येथे गुरुवारी रात्री साडेअकराला समुद्रावर फिरायला गेलेले दोघे जण बुडाले. यातील एकाचा मृतदेह आज सकाळी माहीम खाडीजवळच्या सागरी सेतूजवळ हाती लागला. जावेद आलम शेख (28) असे मृताचे नाव आहे. दुसऱ्याचा शोध अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने सुरू आहे, अशी माहिती आपत्कालीन विभागाने दिली.