
ओमान येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. निरंजन नाथ सुभल चंद्र नाथ असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून बांगलादेशचा आणि हिंदुस्थानचा पासपोर्ट जप्त केला आहे. गुरुवारी पहाटे निरंजन हा ओमान येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या पासपोर्टची पाहणी केली. तो अनेकदा परदेशात गेल्याचे उघड झाले. परदेशात जाण्याबाबत त्याला विचारणा केली. तेव्हा त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. कसून चौकशी केल्यावर त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले. निरंजन हा 2010 साली बांगलादेशातून हिंदुस्थानात आला होता.