ऑक्टोबरमध्ये 11 दिवस बँका बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bank-counter2

ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंती, महानवमी, दसरा, दिवाळी, बलिप्रतिप्रदा, भाऊबीज हे सण येत असल्याने 11 दिवस बँकांना सुटी राहणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये 21 दिवसच बँकांचे कामकाज होणार आहे. त्यामुळे बँकांची सुटी लक्षात ठेवत बँकेशी संबंधित कामकाज उरकावे लागणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात पहिली सुटी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमत्त आहे. 6 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँका बंद असतील. सोमवारी महानवमी आहे. तर मंगळवारी दसरा असल्याने या दिवशी बँकांना सुटी असेल. 12 ऑक्टोबरला दुसरा शनिवार आणि 13 तारखेला रविवार असल्याने बँका बंद राहतील. त्यानंतर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद असेल. 27 ऑक्टोबरला दिवाळी आणि रविवार आहे. या दिवशीही बँका बंद असतील. तर 28 तारखेला पाडवा आणि बलिप्रतिप्रदा आहे. तर 29 तारखेला भाऊबीज असल्याने बँकांना सुटी असेल. त्यामुळे या महिन्यात बँकांना 11 दिवस सुटी आहे.