बँक ऑफ बडोदामध्ये 2700 पदांची भरती

बँक ऑफ बडोदाने 2700 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती संपूर्ण देशभर आहे. महाराष्ट्रात 56 जागा, राजस्थानात 215 जागा, तामीळनाडूत 159 जागा, तेलंगणात 154 जागा, उत्तर प्रदेशात 307 जागा, केरळमध्ये 440 जागा, हरयाणात 400 जागांसह अन्य काही राज्यांत जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर देण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असणारा उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतो. उमेदवाराचे वय किमान 20 ते 28 वर्षे असायला हवे.