एटीएममधून पैसे काढणे महागणार!

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला ज्यादा शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे. एटीएम शुल्कात वाढ करण्यात यावी अशी मागणी नुकतीच एटीएम व्यवस्थापन करणाऱया कंपन्यांच्या ‘कॅटमी’ अर्थात ‘कॉन्फेडरेश ऑफ एटीएम इंडस्ट्री’ या शिखर संस्थेने नुकतीच आरबीआयकडे केली आहे. त्यांची मागणी मान्य झाल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी जादा शुल्क भरावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एटीममधील व्यवहारावर सध्या 15 रुपये शुल्क आकारले जाते. 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात हे शुल्क 17 रुपये करावे आणि इतर व्यवहारांसाठी 7 रुपये शुल्क करावे, अशी संघटनेची मागणी आहे. तसेच एटीएममधील निःशुल्क व्यवहारांची संख्या पाचवरून तीन करण्याचेही संघटनेने सुचवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या