बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल….वाचा सविस्तर

1031

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाचव्यांदा कपात केल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेसह अॅक्सिस, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केले आहेत. या नवीन व्याजदरांमुळे अनेक खातेदारांवर त्याचा परिणाम होणार आहे. सात दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेंवीवर एसबीआयच्या खातेदारांना 4.5 ते 6.25 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 6.75 टक्के व्याज मिळणार आहे. एसबीआयचे हे व्याजदर 10 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.

एसबीआयचे व्याजदर 

मुदत ठेवींचा कालावधी        व्याजदर

 • 7 दिवस – 45 दिवस       4.50%
 • 46 दिवस – 179 दिवस       5.50%
 • 180 दिवस – 210 दिवस      5.80%
 • 211 दिवस – 1 वर्ष     5.80%
 • 1 वर्ष  – 2 वर्षे            6.25%
 • 2 वर्षे – 3 वर्षे            6.25%
 • 3 वर्षे – 5 वर्षे           6.25%
 • 5 वर्षे – 10 वर्षे           6.25%

अॅक्सिस बँक सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतठेवींवर व्याज देते. अॅक्सिस बँकेने 5 नोव्हेंबरपासून नवे व्याजदर लागू केले आहेत. खातेदारांना  3.5 ते 6.85 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येते. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.50 टक्के व्याज मिळते.

एक्सिस बँकेचे व्याजदर

मुदत ठेवींचा कालावधी व्याजदर

 • 7 दिवस – 14 दिवस 3.50%
 • 15 दिवस – 29 दिवस 4.25%
 • 30 दिवस – 45 दिवस 5%
 • 46 दिवस – 5 महिने 5.50%
 • 6 महिने – 9 महिने         6%
 • 9 महिने – 11 महीने 6.25%
 • 11 महीने – 1 वर्ष        6.55%
 • 1 वर्ष- दीड वर्ष        6.45%
 • दीड वर्ष – 2 वर्षे        6.80%
 • 2  वर्षे – 3  वर्षे        6.85%
 • 3 साल – 10 साल        6.75%

एचडीएफसी बँकेने 30 ऑक्टोबरपासून व्याजदरात बदल केले आहेत. खातेदारांना सात दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर बँकेकडून  3.50 ते  6.85 टक्के व्याज देण्यात येते. तर ज्येष्ठ नागरिकांना 4 ते 7.35 व्याज देण्यात येते.

एचडीएफसी बँकेचे व्याजदर 

मुदत ठेवींचा कालावधी व्याजदर

 • 7 दिवस – 14 दिवस 3.50%
 • 15 दिवस – 29 दिवस 4%
 • 30 दिवस – 45 दिवस 4.90%
 • 46 दिवस – 6 महिने 5.40%
 • 6 महिने – 9 महिने        6%
 • 9 महिने – 1 वर्ष       6.25%
 • 1 वर्ष – 2 वर्षे      6.45%
 • 2 वर्षे – 3 वर्षे      6.85%
 • 3 वर्षे – 5 वर्षे     6.75%
 • 5 वर्षे – 10 वर्षे     6.75%

आयसीआयसीआय बँकेचे व्याजदर

मुदत ठेवींचा कालावधी व्याजदर

 • 7 दिवस – 14 दिवस 4%
 • 15 दिवस – 29 दिवस 4.25%
 • 30 दिवस – 45 दिवस 5%
 • 46 दिवस – 184 दिवस 5.50%
 • 185 दिवस – 289 दिवस  6%
 • 290 दिवस – 1 वर्ष 6.25%
 • 1 वर्ष – दीड वर्ष       6.45%
 • दीड वर्ष – 2 वर्षे      6.85%
 • 2 वर्षे – 10 वर्षे     6.75%

 

आपली प्रतिक्रिया द्या