
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी बँक अधिकारी आणि कर्मचाऱयांचा संप तसेच सुट्टय़ांमुळे 21 ते 26 डिसेंबरदरम्यान 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. या काळात एटीएममध्ये गर्दी आणि नोटाटंचाई होऊ शकते. आर्थिक व्यवहारही ठप्प होतील.
वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणास विरोध करण्यासाठी ऑल इंडिया ऑफिसर कन्फडरेशनने उद्या (दि. 21) संप पुकारला आहे. स्टेट बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँकांचा या संपात सहभाग आहे. खासगी आणि सहकारी बँका सुरू राहतील परंतु सुट्टय़ांमुळे त्याही तीन दिवस बंद असतील. याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होणार आहे.
संप आणि सुट्ट्या
– 21 डिसेंबर – बँक कर्मचाऱयांचा संप.
– 22 आणि 23 डिसेंबर – चौथा शनिवार आणि रविवार असल्याने सुट्टी.
– 24 डिसेंबर – कामकाज सुरू राहील.
– 25 डिसेंबर – ख्रिसमस असल्याने बँका बंद.
– 26 डिसेंबर – पुन्हा एकदा संप.






















































