
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, येथून राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल, असे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
बारामतीत अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्याविरोधात उमेदवार देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली आहे. ही भूमिका काँग्रेसला मान्य नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
बिनविरोध निवडणुकीची परंपरा नाही – सपकाळ
महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर बिनविरोध निवडणूक करण्याची कुठलीही परंपरा नाही. अपवादात्मक काही किरकोळ गोष्टी सोडल्या तर सर्वसाधारणपण निवडणूक लढली जाते, असे कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.



























































