
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये गुरुवारी चार ठिकाणी हिंदुस्थानचे सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. बारामुल्ला भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार करण्यात आले. यापैकी एक दहशतवादी हा पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेहमी पुराव्यांसाठी बोंब मारणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली आहे.
Namalnar, Baramulla encounter: Two terrorists were neutralised by the security forces yesterday, identified as Aamir Rasool of Sopore and the other terrorist is a Pakistani national. Both the terrorists were affiliated with proscribed terror outfit JeM #JammuAndKashmir
— ANI (@ANI) March 22, 2019
दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आमीर रसूल हा सोपोरमधून जैशच्या कारवायांसाठी मदत करत होता.
दरम्यान, बांदिपोरा येथील हाजीनमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात हिंदुस्थानच्या जवानांना यश आले असून शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.
Jammu and Kashmir: Two terrorists eliminated by security forces in Hajin,Bandipora. Search operation in progress pic.twitter.com/dZsJ5yXs2O
— ANI (@ANI) March 22, 2019



























































