बारामुल्लात दहशतवादी हल्ला; अडीच वर्षांच्या मुलीसह 4 जखमी

236

बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका गावावर केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. जखमींमध्ये अडीच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 370 कलम हटवल्यानंतर लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला केल्याचे लष्कराने म्हटले आहे. बारामुल्लातील दंगरपुरा गावातील एका घरावर दहशतवाद्यांनी काल मध्यरात्री हल्ला केला. यात मोहम्मद दार, मोहम्मद रमझान दार आणि अर्शिद हुसेन याच्यासह अडीच वर्षांची उस्मा जान ही मुलगी जखमी झाली. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला. जखमींना उपचारासाठी श्रीनगरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू केली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या अडीच वर्षांच्या मुलीला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवावे, असे आदेश राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लष्कराला दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या