बार्शी तालुक्यात कमानीचे काम सुरू असताना दुर्घटना, तिघांचा मृत्यू

565
accident

बार्शी- तुळजापूर रस्त्यावर बावी येथील प्रवेशद्वाराजवळ एका कमानीचे काम सुरु असताना कमान कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. महेश भारत डोळज (वय 27, रा. वैराग), विकास सुग्रीव वाळके ( वय 32, रा. मानेगाव), दिपक संग्राम घोलप (वय 32, रा. दडशिंगे) अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. याबाबत माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात कमानीचे काम कसे सुरु होते,असा प्रश्न उपस्थित होत आहे. झालेल्या घटनेला जबाबदार कोण, बार्शी तालुका पोलीस यावर काय कारवाई करणार असा सवाल विचरण्यात येत आहे. पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या