
कोरोनामुळे सध्या सर्वत्र ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र मोबाईलअभावी अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून अशा विद्यार्थ्यांसाठी ‘टच’ ही संस्था पुढे सरसावली आहे. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ‘टच’ने हा उपक्रम हाती घेतला आहे. वंचित व बेघर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच एक अॅण्ड्राईड फोन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘टच’ने आवाहन केले आहे की, जर कोणाकडे असे (जुने अॅण्ड्रॉईड) मोबाईल असतील किंवा काही कारणास्तव ते मोबाईल वापरात येत नसतील तर असे मोबाईल जमा करून त्यांना विविध जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न ‘टच’ करणार आहे. यासाठी 9819453873 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ‘टच’ संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

























































