बीसीसीआयची रोहित यादववर दोन वर्षांची बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाल्यानंतर काही आठवडय़ांतच बीसीसीआयने बंगालचा लेगस्पिनर रोहित यादववर दोन वर्षांची बंदी घातली आहे. वयाबद्दल खोटी माहिती दिल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला रोहित जुलैमध्ये श्रीलंका दौऱयावर गेलेल्या 19 वर्षांखालील संघात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने सहा विकेट घेतल्या आणि संघाला अंतिम कसोटी जिंकण्यास मदत केली. ‘रोहितवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे,’ असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले. या महिन्याच्या अखेरीस राजकोट आणि अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध होणाऱया हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील देशांतर्गत एकदिवसीय आणि बहुदिवसीय सामन्यांमध्येही तो सहभागी होता.