फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे गेल्या वर्षापासून बीसीसीआयचेही कामकाज ठप्प होते. पण आता कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे बीसीसीआयनेही राष्ट्रीय क्रिकेट अॅक@डमीतील फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. याचसोबत 11 प्रशिक्षकांच्या कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णयही यावेळी बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. अशाप्रकारचे वृत्त मीडियामधून समोर आले आहे.

क्रिकेट प्रशिक्षणाचा कोर्स
कोरोनामुळे बराचसा वेळ वाया गेला. पण बीसीसीआय आता पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रीय क्रिकेट अॅक@डमीतील बहुतांशी पदांसाठी व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. तसेच याआधी क्रिकेट प्रशिक्षणाचा कोर्सही आयोजित करण्यात आला होता. या कोर्समध्ये युसूफ व इरफान पठाण, देवांग गांधी, अभिषेक नायर, अशोक दिंडा, परवेझ रसूल, नमन ओझा या खेळाडूंचा सहभाग होता.

द्रविड यांचा पुन्हा अर्ज
याआधी बीसीसीआयकडून राष्ट्रीय क्रिकेट अॅक@डमीतील प्रमुखपदासाठी अर्ज मागवले होते. राहुल द्रविड यांनी या पदासाठी पुन्हा एकदा अर्ज केला आहे. राहुल द्रविड यांच्या व्यतिरिक्त एकाही व्यक्तीकडून या पदासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. यामुळे मात्र राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान होईल असे वाटत नाही. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.

10 सप्टेंबर अंतिम तारीख
राष्ट्रीय क्रिकेट अॅक@डमीतील फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान, रमेश पोवार, ऋषीकेश कानिटकर, एसएस दास, सुब्रतो बॅनर्जी व सुजीत सोमसुंदर या पाच खेळाडूंचा करार न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. रमेश पोवार सध्या हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तसेच एसएस दास हे याच संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत.