
सामना ऑनलाईन । कोलकाता
हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय ) माजी अध्यक्ष बिश्वनाथ दत्ता यांचे आज फुप्फुसाच्या विकाराने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते . 1982 ते 1988 या कालावधीत बीसीसीआयचे उपाध्यक्षपद सांभाळणाऱ्या दत्ता यांनी 1992 मध्ये क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. बीसीसीआयला आर्थिकदृष्टय़ा समर्थ करणारे जगमोहन दालमिया यांचे मेंटॉर म्हणून बिश्वनाथ दत्ता ओळखले जायचे. दिवंगत दत्ता यांचे पुत्र सुब्रत दत्ता सध्या अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.





























































