IPL अधिक रोमांचक होणार, ‘सामना’ सुरू असताना खेळाडू बदलता येणार

1482

बीसीसीआय जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट लीगमध्ये समावेश होणाऱ्या ‘इंडियन प्रिमियर लीग’मध्ये (आयपीएल) बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. प्रेक्षकांना आयपीएलच्या नव्या मोसमात काही रोमांचकारक बदल आणि नियम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने सध्या बीसीसीआय काम करत असून नवीन मोसमात ‘पॉवर प्लेयर’ हा नियम आणण्याचा विचार करत आहे. या नियमाद्वारे दोन्ही संघ विकेट पडल्यावर अथवा षटक संपल्यानंतर खेळाडू बदलू शकणार आहेत.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, ‘या प्रस्तावाला (‘पॉवर प्लेयर’ नियमाला) मंजुरी मिळाली आहे. परंतु मंगळवारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीमध्ये यावर सविस्तर चर्चा होईल. यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.’

bcci

नवीन नियमानुसार प्रत्येक संघाला सामन्यापूर्वी अंतिम 11 ऐवजी अंतिम 15 खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. यातील एका खेळाडूला सामना सुरू असताना विकेट पडल्यावर अथवा षटक संपल्यानंतर बदली करता येईल. हा नियम आयपीएलमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु सुरुवातीला आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा नियम लागू करणे योग्य ठरेल, असेही बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या नवीन नियमाचा सामन्यावर काय प्रभाव पडेल असे अधिकाऱ्याला विचारण्यात आले असता त्यांनी या नियमामुळे सामन्याचे चित्र पलटू शकते. तसेच दोन्ही संघांना जरा हटके रणनीतीवर विचार करणे भाग पडेल असे सांगितले.

सामन्यावर काय प्रभाव पडू शकतो…
एखाद्या संघाला 6 चेंडूत 20 धावांची आवश्यकता असेल आणि दुखापतीमुळे आंद्रे रसेलसारखा विस्फोटक फलंदाज बाहेर बसलेला असेल व तो अंतिम-11 मध्ये नसेल तर नवीन नियमानुसार तो बदली खेळाडू म्हणून मैदानावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. मोठे फटके मारून तो सामन्याचा निकाल बदलू शकतो. तसेच गोलंदाजांच्या बाबतीतही हा नियम लागू होतो. अखेरच्या षटकात 6 चेंडूत 6 धावांची आवश्यकता असताना बुमराहसारखा सर्वश्रेष्ठ गोलंदाज बाहेर असेल तर नवीन नियमानुसार तो गोलंदाजीसाठी येऊ शकतो आणि सामन्याचे चित्र पालटू शकतो. नवीन नियमाचा दोन्ही संघांना समान फायदा होऊ शकतो, असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ipl

आपली प्रतिक्रिया द्या