टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी 2000 अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
team-india

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वर्ल़्डकपमधील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज देखील मागवले आहेत. गेल्या महिन्याभरात या पदासाठी तब्बल 2000 अर्ज आल्याचे समोर आले आहेत.

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी 2000 अर्ज आले आहेत. मात्र त्यातील एकही नाव हे रवी शास्त्रीपेक्षा जास्त अनुभवी नाहीए. प्रशिक्षक पदासाठी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी तसेच न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसन, माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू, लालचंद राजपूत, रॉबिन सिंग यांनी देखील अर्ज केल्याचे समजते.

सध्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी, हिंदुस्थानचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि माजी हिंदुस्थानी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.