अस्वलाने वाचवले कावळ्याचे प्राण; पहा व्हिडीओ 

1273

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक अस्वल कावळ्याचे प्राण वाचवतांना दिसत आहे. हा व्हिडीओ हिंदुस्थानी वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, ‘या अस्वलाने कावळ्याला मदत करुन जगात बदल नाही घडवला..मात्र त्याने एका जीवाला नवीन जीवन दिल आहे. हात जोडून सलाम. गरजूंना मदत करा.’

या व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक कावळा तलावामध्ये पडला होता. खूप प्रयत्न करूनही तो तलावातून बाहेर पडू शकत नव्हता. त्यावेळी तिथे जवळच बसलेला एक अस्वल कावळ्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. जेव्हा अस्वलाने पाहिलं की खूप प्रयत्न करूनही कावळा तलावातून बाहेर येऊ शकत नाही. तेव्हा तो कावळ्याच्या मदतीसाठी पोहोचला. अस्वलाने कावळ्यांना आपल्या तोंडाने पकडून बाहेर काढले. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावुक झाले आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं आहे की, ‘सर्व प्राणी धोकादायक नसतात, तर काहीजण मित्र बनू शकतात.’

आपली प्रतिक्रिया द्या