व्याजाच्या रक्कमेसाठी वृध्द दाम्पत्यास डांबून ठेवत मारहाण

मुलाने व्याजाने 40 हजार रुपये घेतले परंतु त्या रक्कमेसाठी सावकाराने मुलाच्या आई-वडिलांना जबरदस्तीने घरातून अपहरण करून आपल्या घरी डांबून ठेवले आणि मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रकाश विठ्ठल वैजवाडे (वय 75) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, त्यांचा मुलगा अमोन याने लक्ष्मीकांत उर्फ चेतन सुरेश होगळे याच्याकडून व्याजाने 40 हजार घरखर्चासाठी घेतले आहेत, असे लक्ष्मीकांत याने सांगितले. त्याने जबरदस्तीने तक्रारदार व त्याच्या पत्नीस मोटारसायकलवर बसवून त्याच्या एमआयडीसी येथील घरी नेले.

त्याने तिथे त्यांना डांबून ठेवले. त्यांच्या मुलाशी मोबाईलवर बोलून तो जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही, असे त्याने सांगितले. तक्रारदराच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तिला मारहाण करताना तुटून त्यांच्या घरी पडले. त्यानंतर त्याने दोघांनाही सोडले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी लक्ष्मीकांत उर्फ चेतन सुरेश होगळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या