
बीड जिल्ह्यामध्ये काल दिवसभर अॅन्टिजेन चाचणीमध्ये 210 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दिवसभर घेतलेल्या घशाच्या स्वॅबमध्येही 78 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 499 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बीड जिल्ह्यात पाच शहरांमध्ये काल रॅपिड अॅन्टिजेन तपासणी केली. या तपासणीला पाच शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पुढचे दोन दिवस या तपासण्या सुरूच राहणार आहेत. काल 210 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. दिवसभर रूग्णांच्या संपर्कात असलेल्या आणि लक्षणे असलेल्या 579 नागरिकांच्या थ्रोटचे स्वॅब घेण्यात आले होते. आरटीपीआरचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला. यात 499 जण निगेटिव्ह आले. 78 जण पॉझिटिव्ह आले तर दोघा जणांचा अहवाल अद्याप अनिर्णियीत आहे. काल 78 कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यात अंबाजोगाई 5, परळी 14, बीड 21, गेवराई 3, आष्टी 5, वडवणी 2, माजलगाव 2, केज 7, शिरूर 7, धारूर 12 जणांचा समावेश आहे.
कोरोनामुक्त रूग्णांचे सलग तिसऱ्या दिवशी द्विशतक
एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांचा वाढता आकडा चिंता व्यक्त करायला लावणारा असला तरी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या तीन दिवसापासून कोरोनावर मात केलेल्या रूग्णांचा आकडा 200 च्या पुढे आहे. तीन दिवसात 600 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. आजही 225 रूग्ण कोरोनामुक्त होत आहेत. आतापर्यंत 2972 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात उपचार घेत असलेले रूग्ण 1231 एवढे आहे. कोरोनामुक्त झालेले रूग्ण 1665 एवढे आहेत. बुधवारी सुट्टी घेणारे रूग्ण 225 एवढे आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 76 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.























































