बीड बायपासजवळ अपघात; दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड बायपासवरुन जामखेडकडे मोटारसायकलवर जात असताना मोटारसायकल व रिक्षा टमटमचा अपघात होऊन दोन युवक ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील दोन्ही युवक जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील आहेत. नंदु भिमराव खोजे ( वय 20) व रोहन बळते अशी त्यांची नावे आहेत.

हे दोघेजण सोमवारी अंबड तालुक्यातील जोगलादेवी येथून जामखेड येथे जात असताना बीड बायपास जवळ आले असता. रिक्षा टमटम व त्यांच्या मोटारसायकलची धडक झाली. या अपघातात रोहन बळते जागीच ठार झाला तर नंदु खोजे यास बीड येथील सरकारी रुग्णालयातून संभाजीनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना गेवराईजवळ नंदुचाही मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी येथे आणण्यात आले आहे. दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने जोगलादेवीसह तीर्थपुरी व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.