अंबाजोगाईत कावळे आणि मोर मृत पावले, तपासणीसाठी पुण्याकडे रवाना

बर्ड फ्ल्युची दहशत पसरलेली असताना अंबाजोगाईमध्ये मृत कावळे सापडले आहेत. तटबोरगाव येथे दोन मोर आणि एका पक्षाचाही मृत्यू झाला आहे तर धावडी येथे कावळ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कावळ्यांचा आणि मोरांचा मृत्यू नेमका कशाने झाला, तपासणीसाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्ल्युची दहशत माजली आहे. पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे कावळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तपासणीचा अहवाल आला आणि कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्युमुळे झाल्याचे उघड झाले. आज बुधवारी अंबाजोगाई शहरातील केशवनगर येथे भर वस्तीत अंगणामध्ये मरून पडलेले कावळे सापडले. तटबोरगाव येथे दोन मोरांचा मृत्यू झाला तर धावडी येंथेही मयत कावळे सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत्युमुखी पडलेल्या कावळे आणि मोरांच्या तपासणीसाठी पुण्याकडे पाठवण्यात आले आहे. बर्ड फ्ल्यू असल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे. तपासणीचा अहवाल तीन दिवसानंतर प्राप्त होणार आहे. मृत्युचे कारण नेमके काय हे त्यानंतरच उघड होईल.

आपली प्रतिक्रिया द्या