आष्टी – बिबट्याच्या हल्ल्यात पंचायत समिती सदस्याचा पती जागीच ठार

शेतातील ज्वारीच्या पिकास पाणी देत असतांना अचानक बिबटयाने हल्ला करुन 36 वर्षीय व्यक्तीस ठार केल्याची घटना तालुक्यातील सुरुडी येथे घडली. नागनाथ गहिनीनाथ गर्जे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास उघडकीस आली.

तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या सुरुडी गावामध्ये नागनाथ गहिनीनाथ गर्जे हे त्यांच्या शेतामध्ये ज्वारीच्या पिकास पाणी देत असतांना अचानक बिबटयाने हल्ला केला. हल्ल्यातून सावरण्याची सवडही त्यांना मिळाली नाही. बिबट्याने त्यांच्या मानेचा व तोंडाचा लचका घेतला. यात त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

नागनाथ गर्जे हे पंचायत समिती सदस्या आशा नागनाथ गर्जे यांचे पती आहेत. घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने बिबटयांच्या बंदोबस्त करावा असी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या