बीड जिल्ह्यात 82 कोरोनाग्रस्तांची भर, तब्बल 2013 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

बीड जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी प्राप्त झालेल्या 2095 जणांच्या अहवालात 82 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तर तब्बल 2013 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त असल्याने बीड जिल्ह्याला आज दिलासा मिळाला.

शुक्रवारी दुपारी 295 जणांचे अहवाल प्राप्त झाले. या अहवालात बीड जिल्ह्यामध्ये 82 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले तर 2013 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.

शुक्रवारी अंबाजोगाई 6, आष्टी 11, बीड 24, धारूर 1, गेवराई 8, केज 3, माजलगाव 6, परळी 5, पाटोदा 7, शिरूर 8, वडवणी 3 असे रूग्ण सापडले. आज तपासण्या मोठ्या प्रमाणावर होऊनही पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या घटल्याने बीड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार 643 जण कोरोनाबाधित सापडले आहेत.

त्यातील 10 हजार 907 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर 1329 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 128 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. रूग्ण बरे होण्याचा दर 86.27 वर पोहचला. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्युचा दर 3.22 एवढा आहे. आजपर्यंत 407 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या