
बीड जिल्ह्यात अजून पाच जण कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा 106 वर पोहोचला आहे. दरदिवशी या आकड्यामध्ये भर पडत असल्याने बीड जिल्ह्याची चिंता वाढली आहे
बीड जिल्ह्यातून आज 31 व्यक्तिच्या सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात पाच जणांना कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आता बीड जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या 106 वर पोहोचली आहे. शनिवारीच बीड जिल्ह्यात 9 जणांना कोरोना लागण झाली होती. आज पुन्हा 5 जण कोरोना बाधित झाल्याने बीड जिल्ह्याच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य प्रशासनावर ही मोठा ताण पडत आहे.
परिस्थती नियंत्रणात असली तरी कोरोना बधितांचा आकडा सतत वाढत आहे. नागरिकांनी काळजी घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे. गर्दीत जाणे टाळून, सतत मास्कचा वापर करा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी केले आहे.





























































