बीडमध्ये पत्नीचा खून करून पती पोलिसात हजर

829
murder

एका 35 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजता शहरातील जालना रोडवरील हिना पेट्रोलपंपाजवळ घडली. महिलेला मारल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिना पेट्रोलपंवाजवळ एका 35 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत तिचा खून करून आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर घटनास्थळी डीवायएसपी भास्कर सावंत, शहर पोलीस ठाण्याचे एपीआय गजानन जाधव यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या