कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत बीड जिल्हा प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बीड

बीड जिल्हा अनेक क्षेत्राबरोबरच राष्ट्रीय आरोग्य अभियानात ही सरस कामगिरी करत आहे. कुटूुंब कल्याण शस्त्रक्रियेत बीड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. बीडमध्ये चार महिन्यात तब्बल आठ हजार कुटूुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

कृषी, शिक्षण, खेळ, सांस्कृतिक क्षेत्रात बीड जिल्ह्याची घोडदौड सुरू आहे. अनेक अभियान यशस्वी पणे राबवले जात असतांना राष्ट्रीय कुटूंब कल्याण योजने मध्ये ही बीड जिल्हा सरस ठरत आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचे महत्व पटू लागल्यामुळे कुटूंब कल्याण शस्त्रक्रिये साठी फार प्रसार आणी प्रचार करण्याची गरज आता निर्माण होत नाही. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत अभियानाने मोठी मुसंडी घेतली .गत चार महिन्यात तब्बल आठ हजार शस्त्रक्रिया बीड जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी विक्रमी 1197 तर डॉ सदाशिव राऊत यांनी 1058 शस्त्रक्रिया ग्रामीण भागात फिरून केल्या आहेत. कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेत बीड जिल्हा राज्यात टॉप वर आहे. शस्त्रक्रियाचा हा सरासरी आकडा आणि गती कायम ठेवण्याचा निर्धार जिल्हा आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. जिल्हा रुग्णालयात ही या शस्त्रक्रिया वर भर दिला जात आहे. बीड जिल्हा आरोग्य विषयक बाबतीत सतर्क झाला आहे.