बीड – शेततळ्यात बुडून बाप लेकासह तिघांचा मृत्यू

गेवराई( सा.वा) शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सुनील पंडित व त्यांचा मुलगा व भांचा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार रोजी साडे चार वाजता दैठण येथे घडली .

या बाबत अधीक माहिती अशी कि सुनिल जग्गनाथ पंडित (40) राज सुनिल पंडित (12) व पंडीत यांचा भाचा या तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. राज व त्याचा चुलत भाऊ दोघे शेततळ्यात पोहायला गेले होते. अचानक ते बुडू लागले. त्यांना वाचविण्यासाठी सुनिल यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र ते त्यांना वाचवू शकले नाहीत व या दुर्घटनेत तिघांचाही दुर्दैवी अंत झाला. घटनास्तळावर पोलीसांनी पंचनामा केला असुन शवविछेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णलयात आणण्यात आले आहे .

आपली प्रतिक्रिया द्या