…आणि मनोरुग्ण झाला मोटरमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। परळी वैजनाथ

रेल्वेगाडी चालवणे हे काही येड्या गबाळ्याचे काम नाही. पण जर समजा एखादी अशीच व्यक्ती जर तुमची मोटरमन आहे हे तुम्हांला समजलं तर तुमची काय अवस्था होईल. असंच काहीस मंगळवारी परळी अकोला गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत झालं आहे. मात्र वेळीच रेल्वे केबिनमध्ये आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांने व पोलिसांनी या मनोरुग्णास बाहेर काढले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

परळी स्थानकावर दुपारी परळी अकोला गाडी थांबली होती. गाडी सुटण्यास अवकाश असल्याने मोटरमन व त्याचा सहाय्यक केबिनमध्ये आले नव्हते. त्याचवेळी एक तरुण रिकामी केबिन बघून आत चढला व मोटरमनच्या सीटवर बसला. फलाटावर उभे असलेल्यांना तो मोटरमनच असावा असे वाटले. यामुळे त्यांनी त्याच्याकडे फार लक्ष दिले नाही. मात्र काहीवेळानंतर मोटरमन व त्याचा सहाय्यक आले. केबिनमध्ये मनोरुग्ण व्यक्ती बसली असून ती तेथील यंत्रणेबरोबर छेडछाड करत असल्याचे बघून त्यांचे धाबे दणाणले. त्यांनी लगेचच त्याला खाली उतरण्यास सांगितले. पण तो ऐकण्यास तयार नव्हता. अखेर 40 मिनिटांनंतर पोलिसांनी मनोरुग्णास केबिनमधुन बाहेर काढले.