बीड पालिकेच्या सर्वच सभापती पदांवर शिवसेनेचा झेंडा

2719

पुढील एक वर्षासाठी बीड नगर पालिकेच्या विषय समिती सभापतींची आज मंगळवारी दुपारी निवडणूक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. पाचही सभापतीपद शिवसेने राखले आहे.

बांधकाम समितीच्या सभापतीपदी सविता राजेंद्र काळे यांची निवड केली गेली. तर नियोजन सभापती म्हणून भिमराव वाघचौरे, पाणी पुरवठा सभापती म्हणून रविंद्र कदम, शिक्षण सभापतीपदी मुन्ना इनामदार व स्थायी समितीच्या सभापतीपदी विनोद मुळूक व शेख मोहम्मद सादेक यांची निवड करण्यात आली आहे.

beed

नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांच्याच गटाचे सर्व सभापती झाले असून न प ताब्यात घेणाऱ्याचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत,सर्व नवनिर्वाचित सभापतींच्या निवडीनंतर नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर, डॉ योगेश क्षीरसागर, नगरसेवक जगदीश गुरखुदे विनोद मुळुक यांनी त्यांचा सत्कार केला.

आपली प्रतिक्रिया द्या