बीड – कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, नवे 19 रुग्ण आढळले

बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आता वाढत आहे. दोन दिवसातील 470 जणांचे अहवाल आज दुपारी प्राप्त झाले. त्यामध्ये 451 जण निगेटिव्ह आले असून 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला  आहे.

बीड जिल्ह्यात दोन दिवसापासूनचे अहवाल प्रलंबित होते. बुधवारी दुपारी 479 जणांचा अहवाल प्राप्त झाला. यात 19 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे तर 451 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 19 बाधितांमध्ये बीड शहरातील 7 रूग्ण आहेत, परळी शहरातील 6 जण आहेत, गेवराई तालुक्यातील 2, अंबाजोगाई तालुक्यातील 2 जण तर गेवराई, आष्टी आणि माजलगाव तालुक्यातील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. बीड शहरामध्ये कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असताना परळीतही कोरोनाची भीती कायम आहे. 20 तारखेपर्यंत परळीमध्ये संचारबंदी आहे. आजही 6 रूग्ण परळीमध्ये आढळून आले आहेत. हे रूग्ण कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कातील आहेत. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 261 च्या घरात गेली आहे आणि नविन आढळून येणारे रूग्ण संपर्कातील असल्यामुळे भीती वाढली आहे.

त्या रूग्णालयामुळे ताण वाढला

बीड शहरातील नवजीवन रूग्णालयात 54 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच या रूग्णास जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि तो रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि जिल्हा रूग्णालयातील उपचार घेणाऱ्या रूग्णांचे आणि हॉस्पिटलध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले. यात तब्बल पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये एक रूग्ण गेवराईचा आहे तर चार रूग्ण बीड शहरातील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या