बीड – शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ, खून झाल्याचा पालकांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड तालुक्यातील रत्नागिरी येथे शाळेत गेलेल्या एका विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धनराज सपकाळ असे मुलाचे नाव असून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

बीड तालुक्यातील नेकनूर जवळच असलेल्या रत्नागिरी येथील धनराज सपकाळ हा आपल्या बहिणीसोबत शाळेत गेला होता. मात्र शाळेतून तो परत न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. शाळेजवळ त्याचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून धनराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, आपल्या मुलाचा खून झाल्याचा आरोप करीत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.