बीड मध्ये स्वाईन फ्लूची साथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बीड

बीड जिल्ह्यात मलेरिया, चिकन गुणिया आणि डेंग्यूने शिरकाव केला असतांनाच आता स्वाईन फ्लू ही वेगाने पसरत आहे. येथील सरकारी रुग्णालयात दोन स्वाईन फ्लू रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्हयात इतर तीन संशयित रुग्णही आढळले आहेत.

गेल्या महिन्यापासून येथे डेंग्यू वेगाने पसरत आहे , मलेरियाचे रुग्ण ही सापडत आहेत, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. एकीकडे साथीचे आजार तर साथीच्या आजाराबरोबरच आता स्वाईन फ्लू देखील पसरत असल्याची स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. मागील ३ दिवसात जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांमधून २ स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिवाय ३ रुग्ण स्वाईन फ्लू सदृश्य असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. विशेष म्हणजे या ३ रुग्णापैकी एक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून न सांगताच निघून गेला असे डॉक्टरांनी सांगितले आहे.