बीडच्या पंचरत्नांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जिल्ह्याचे मागासलेपण पुसून टाकले – जयदत्त क्षीरसागर

510

माणसाची चिकाटी आणि जिद्द असेल तर कुठलेही ध्येय साध्य होते. गुणवत्तेच्या क्षेत्रात आपण कमी नाहीत हे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. बीडच्या पंचरत्नांनी शिक्षणाच्या बाबतीत जिल्ह्याचे मागासलेपण पुसून टाकले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

केंद्रिय लोकसेवा आयोग – UPSC परिक्षेत बीड जिल्हातील 5 जणांनी यश संपादन केले. आज या पंचरत्नांचा सत्कार सोहळा नगर परिषद बीड,काकू-नाना प्रतिष्ठान,आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था बीड यांच्या वतीने माजी मंञी जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

देशातुन 22 वा राज्यातुन दुसरा क्रमांक आलेले मंदार पत्की तसेच डॉ. प्रसन्न लोध यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बाकीचे अन्य तीन जण कंटेनमेंट झोन मध्ये असल्याकारणाने उपस्थित राहु शकले नाही मात्र त्यांनाही यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कालिदास (नाना)थिगळे, जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, सचिन मुळूक, दिनकर कदम, विलास बडगे, अरुण डाके, डॉ.योगेश (भैय्या) क्षीरसागर, वैजिनाथ तांदळे, गणपत डोईफोडे, सुनिल सुरवसे, परमेश्वर सातपुते, संपादक अजित वरपे, डॉ.सतिष साळुंके, डॉ.अरुण भस्मे, डॉ. हंगे, नागेष तांबारे, विठ्ठल गुजर, विकास यादव, जयदत्त थोटे, विशाल मोरे यांच्यासह परिवारातील सदस्य, आदि. उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या