बीडमध्ये व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष शिवसेनेत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बीड

व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा बीडचे प्रतिष्ठीत व्यापारी संतोष सोहनी यांनी काल माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांचा शिवसेनेमध्ये हृदय सत्कार केला. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे ही उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील शिवसेनेला उत्साहाचे उधाण आले आहे. अनेक प्रतिष्ठीत लोक शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. भलीमोठी यादी शिवसेना प्रवेशासाठी तयार होत आहे. काल व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा बीडचे प्रतिष्ठीत व्यापारी संतोष सोहनी यांनी माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुके घेऊन शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, योगेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. शिवसेना प्रवेशानंतर संतोष सोहनी म्हणाले, मी आज शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करत आहे.

माझे मित्र अनिल जगताप यांच्या आग्रहाखातर त्यांच्या नेतृत्वाखालीच मी शिवसेनेमध्ये दाखल होत आहे. यापुढे शिवसेना पक्षवाढीसाठी माझे प्रयत्न असणार आहेत. देव, देश, धर्म यासाठी काम करणाऱ्या शिवसेनेचे मला पहिल्यापासूनच आकर्षण होते. आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे असेही ते ’सामना’शी बोलताना म्हणाले.