Video मराठा आरक्षणासाठी महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा  आरक्षणासाठी एकीकडे 11 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठींबा मिळत असून राज्यात जागोजागी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. अशातच बीड मधील वासनवाडी या गावात चार महिलांनी स्वत:ला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेत आंदोलन केले आहे.

वासनवाडी या गावातील या चार महिलांनी मराठा आरक्षणासाठी स्वत:ला जमिनीत गाडून घेतले होते. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा, आरक्षण दिलंच पाहिजे, जय शिवराय, कोण आल्या रे कोण आल्या कोण आल्या महाराष्ट्राच्या वाघिणी आल्या, या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा या महिलांनी दिल्या. तसेच यावेळी त्यांनी ‘आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे’ अशी मागणी देखील केली. या आंदोलनाची माहिती अधिकाऱ्यापर्यंत पोहचल्यानंतर गावातील प्रशासकीय अधिकारी आंदोलनस्थळी आले होते.