बीड : मध्यान्ह भोजनामधून 100 विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

बीड तालुक्यातील वांगी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत मध्यान्ह भोजनसाठी असलेल्या मटकी मधून 100 पेक्षा जास्त चिमुरड्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वांगी येथील जिल्हा परिषदेच्या प्रार्थमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवारी मध्यान्ह भोजन देण्यात आले. यातील मटकीमुळे तब्बल 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विष बाधा झाली आहे. मुलांना उलट्या, मळमळ असा त्रास सुरू झाला. विषबाधा झाल्याचे लक्षात येताच गावात एकच धावपळ उडाली. मुलांना उपचारासाठी बीडमध्ये घेऊन जाण्यासाठी तातडीने वाहनांची व्यवस्था करावी लागली. सर्व विषबाधित चिमुरड्यांवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थी रुग्णालयाकडे निघताच उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. जिल्हाशल्य चिकित्सक अशोक थोरात लक्ष ठेऊन आहेत.