बैलाचे मांस विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या दोघांना अटक; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

तालुक्यातील नाव्हा चौफुलीमार्गे काही व्यक्ती एका बोलेरो पिकअपमध्ये विनापरवाना गोमांस घेवून जात असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना पकडले. जालना शहरात कोम्बींग ऑपरेशन करीत असताना 3 मार्च रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना त्यांच्या खबऱ्कडून माहिती मिळाली की, नाव्हा चौफुलीमार्गे काही व्यक्ती एका बोलेरो पिकअपमध्ये विनापरवाना गोमांस घेवून येत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस निरीक्षक गौर त्यांच्या पथकासह व शहर वाहतुक शाखा जालना येथील सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांना सूचना करुन पथकासह नाव्हा चौफुली येथे बोलावले.

नाव्हा चौफुली जालना येथे सापळा लावून थांबले असता सकाळी 6 वाजता बोलेरो सिंदखेडाराजा रोडने जालनाकडे येत असताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. वाहनात लोखंडी टाकीमध्ये मांसाचे मोठमोठे तुकडे आढळले. टाकीवर पांढऱ्या रंगाच्या भुशाने भरलेल्या गोण्या टाकल्या होत्या. वाहनातील दोघांची चोकशी करण्यात आली. शेख राजीक शेख सुलतान (रा. हास्मीनगर, पारपेट मलकापुर), शेख आसीम शेख इब्राहिम (रा.
नयाप्लाट मुक्ताईनगर, जि.जळगाव) अशी त्यांची नावे आहेत. वाहनाबाबत विचारले असता वाहन मालक मोहम्मद आसीफ शेख खाजा (रा. गंगु, प्लॉट वाशीम) हे असल्याचे सांगितले.

गाडीतील मांस बैलाचे असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्याकडून बैलाचे 15 किलोचे एकुण 2 लाख 25 हजार व बोलेरो पिकअप वाहनाची किंमत 5 लाख असा एकूण 7 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या मांसाची पाहणी व पुढील कार्यवाहीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वायकोस यांना बोलावण्यात आले. तपासणीसाठी मांसाचे नमुने घेऊन मास नगर परिषद जालना यांच्या मदतीने नियमानुसार नष्ट करण्यात आले आहे. आरोपींविरुध्द तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, शेख रज्जाक, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, रंजित वैराळ, मदनसिंग बहुरे, सचिन चौधरी, विलास चेके, धम्मपाल सुरडकर, राजेश निर्मळ, उदलसिंग जारवाल, राजु ठाकूर, गणपत पवार आदींनी पार पाडली.