‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम

बॉलीवूडमधला सर्वात शिस्तप्रिय अभिनेता म्हणून अक्षय कुमार ओळखला जातो. सकाळी 4 वाजता उठून जिम करणे असो किंवा रात्री लवकर झोपणे असे काही अलिखित नियम त्याने स्वत:साठी आखले आहेत. अगदी कामाच्या बाबतीत देखील तो शिस्तप्रिय आहे. दिवसातून 8 तासांपेक्षा जास्त काम करायचे नाही असा निर्णय त्याने 18 वर्षांपूर्वी घेतला आहे. मात्र आगामी बेलबॉटम या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयने आपल्या या नियमाला बगल दिली असून सध्या तो डबल शिफ्टमध्ये काम करतोय. लॉकडाऊननंतर अक्षयने नव्या जोमाने कामाला सुरूवात केली आहे. सध्या त्याच्या आगामी बेलबॉटम या चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंडमध्ये सुरू आहे. लॉकडाऊननंतर परदेशात शूटिंग होणारा हा पहिला बॉलीवूडचा चित्रपट आहे. चित्रपटाची टिम परदेशात गेल्यानंतर त्यांना 18 दिवस क्वारंटाईन रहावे लागले. त्यामुळे निर्मात्यांच्या नुकसानीची कल्पना असल्याने अक्षयने डबल शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या