बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे नेतृत्व, 79 कसोटींत 5 हजारांहून अधिक धावा,174 विकेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अष्टपैलू बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. जो रूटने कर्णधारपद सोडल्यावर आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने कर्णधार म्हणून स्टोक्सच्या निवडीची घोषणा आज केली. बेनने आपल्या 79 कसोटी लढतींच्या क्रिकेट कारकीर्दीत 5061 धावांची नोंद केली असून 174 विकेटही मिळवल्या आहेत. त्याने डिसेंबर 2013 मध्ये इंग्लंड संघातून कसोटी पदार्पण केले आहे. कसोटीत 258 ही स्टोक्सची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

इंग्लंड क्रिकेट संघासाठी येता काळ मोठा कसोटीचा आहे. या स्थितीतून स्टोक्स संघाला बाहेर काढून विजयपथावर नील असा विश्वास इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी व्यक्त केला आहे. तर मावळता कर्णधार जो रूट याचे योगदान इंग्लंड संघासाठी यापुढेही अतिशय महत्त्वाचे असेल. कर्णधार म्हणून मी नव्या जबाबदारीची सुरुवात करण्यासाठी अतिशय उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त कर्णधार बेन स्टोक्स याने व्यक्त केली. कर्णधार म्हणून स्टोक्सच्या नव्या जबाबदारीचा शुभारंभ त्याचे जन्मस्थान असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंड इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.