बदाम घालून दूध पिल्याने आरोग्यास मिळतील ‘हे’ अगणित फायदे

बदाम आणि दूध दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हे दोन्ही एकत्र सेवन केले तर अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. बदाम आणि दूध पिल्याने शरीरात कॅल्शियमची पूर्तता होते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन वाढणाऱ्यांसाठी बदाम आणि दुधाचे मिश्रण टॉनिकसारखे काम करू शकते. म्हणूनच आहारात नियमितपणे बदाम आणि दूध समाविष्ट केले पाहिजे.

 

आपल्या आरोग्यासाठी जवस खाणे का हितावह आहे, वाचा

बदाम पोषक तत्वांनी समृद्ध असतात, म्हणून आरोग्य तज्ञ देखील नेहमीच बदाम खाण्याची शिफारस करतात. बदाममध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ई, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यासोबत बदामात कॅल्शियम, पोटॅशियम, रिबोफ्लेविन आणि नियासिन चांगल्या प्रमाणात असते.

दुधाचे पौष्टिक मूल्य

दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने खूप चांगल्या प्रमाणात असतात. तसेच, दुधात काही प्रमाणात मॅग्नेशियम आणि कोबालामिन असते.

चहामध्ये पुदिन्याची पाने घातल्यावर मिळतील हे आश्चर्यचकीत करणारे फायदे

बदाम दूध पिण्याचे फायदे

बदाम आणि दूध पिल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. हे दूध आपली त्वचा तसेच केसांसाठी अतिशय उत्तम मानले जाते. बदाम आणि दूध महिला आणि पुरुषांशी संबंधित समस्या देखील दूर करतात. वजन वाढवण्यासाठी देखील हे दूध प्रभावी मानले जाते.

बदाम आणि दूध त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. बदाममध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण चांगले असते, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते. सुमारे 95 ग्रॅम बदामांमध्ये 24.9 मिलीग्राम व्हिटॅमिन ई असते.

आजकाल हाडांशी संबंधित समस्या खूप दिसून येत आहेत. बहुतेक महिलांना याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत बदाम आणि दूध सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. बदाम आणि दुधात पुरेसे कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

बदाम आणि दूध दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध असतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वांची देखील आवश्यकता असते. बदाम आणि दुधात प्रथिनांचे प्रमाण देखील मुबलक प्रमाणात आढळते.

बदाम आणि दूध पिल्याने थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. नाश्त्यात बदाम आणि दूध पिल्याने उर्जावान राहायला मदत मिळते.

Health Tips – रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यापासून ते पचनापर्यंत ‘या’ बाटलीतले पाणी पिण्याचे आहेत असंख्य फायदे

बदाम आणि दूध कसे सेवन करावे?

रात्री एका ग्लास गरम दुधात 3-4 बदाम मॅश करा. रात्री झोपण्यापूर्वी हे दूध पिणे फायदेशीर आहे.

रात्री 4-5 बदाम भिजवा. सकाळी त्यांची साले काढून टाकल्यानंतर तुम्ही ते दुधासोबत बारीक करून प्या. नाश्त्यात बदाम आणि दूध घेऊ शकता.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बदाम आणि मिल्क शेक देखील बनवून पिऊ शकता. ते केवळ चविष्टच नाही तर पौष्टिक देखील आहे.