डोळ्यांवर काकडीचे काप लावण्याचे आहेत खूप सारे फायदे, वाचा

झोपेचा अभाव आणि तासन् तास मोबाईलच्या स्क्रीनच्या संपर्कात असल्यामुळे, आपल्याला डोळ्यांच्या तक्रारी भेडसावु लागल्या आहेत. सध्याच्या घडीला डोळ्यांना सूज आणि काळ्या वर्तुळांचा त्रास सहन करावा लागत आहे. सोशल मीडिया आणि ब्युटी टिप्समध्ये अनेकदा पाहिले असेल की, काकडीचे काप डोळ्यांवर ठेवून आराम करतात. डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरोखर डोळ्यांना आराम मिळतो का की तो फक्त एक सौंदर्य ट्रेंड बनला आहे? हे आपण जाणून घेऊया

डोळ्यांवर काकडीचे काप ठेवण्याचे खूप सारे फायदे

साध्या पाण्यात ‘या’ वस्तू घातल्यास, आरोग्यास मिळतील आश्चर्यकारक फायदे! वाचा

काकडीत असलेले व्हिटॅमिन सी, कॅफिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांची सूज कमी करण्यास आणि काळी वर्तुळे हलकी करण्यास मदत करू शकतात. याला पूर्णपणे वैज्ञानिक पद्धत म्हणता येणार नाही, परंतु हा घरगुती उपाय अनेक लोकांसाठी प्रभावी ठरला आहे.

काकडीत असलेला थंडपणा सूज कमी करण्यास उपयुक्त ठरतो. खासकरुन आपण दिवसभर संगणकावर काम करत असल्यास, डोळ्यांवर काकडीचे काप ठेवणे अधिक उत्तम.

काळी वर्तुळे हलकी करण्यास मदत करते. काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने, काळी वर्तुळे ही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

काकडीत असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि सिलिका डोळ्यांखालील त्वचेला टोन करण्यास मदत करू शकतात.

काकडीत जास्त प्रमाणात पाणी असते, जे डोळ्यांभोवतीच्या त्वचेला ओलावा प्रदान करते.

Health Tips – फक्त थेंबभर ‘या’ तेलामुळे तुम्हाला मिळतील आरोग्यवर्धक फायदे

डोळ्यांवर काकडी ठेवण्याची योग्य पद्धत?

काकडी 15 ते 20 मिनिटे फ्रीजमध्ये थंड करा.

नंतर दोन गोल काप कापून डोळ्यांवर ठेवा.

डोळे बंद करा आणि 10 ते 15 मिनिटे आराम करा.

सावधगिरी देखील महत्वाची आहे.

काकडी पूर्णपणे धुतल्यानंतरच डोळ्यांवर लावायला हवी.

ऍलर्जी किंवा त्वचेवर जळजळ होण्याची समस्या असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा.

काकडी फक्त थकवा आणि सूज कमी करण्यास मदत करते, डोळ्यांच्या कोणत्याही गंभीर आजारात त्याचा वापर करू नका.

काकडी डोळ्यांना आराम देण्याचा एक नैसर्गिक आणि सोपा मार्ग असू शकतो, परंतु त्याला डोळ्यांचे औषध मानणे चुकीचे ठरेल. हा फक्त एक सहाय्यक घरगुती उपाय आहे, उपचार नाही. डोळ्यांमध्ये सतत जळजळ, सूज किंवा वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.