
कोथिंबीर आपण पदार्थात सगळ्यात शेवटी मिसळत असलो तरीसुद्धा ती आपल्या पदार्थांना चविष्ठ, आणि रुचकर बनवते. आपल्याकडे पदार्थांमध्ये कोथिंबीरचा वापर आवर्जून केला जातो. थोडक्यात काय तर कोथिंबीर घातल्यानंतर पदार्थ हा खऱ्या अर्थाने घडतो. पदार्थांत कोथिंबीरच नसेल, तर तुम्ही नक्कीच चवीष्ठ आणि रुचकर स्वादाला मुकत आहात. त्याशिवाय या कोथिंबीरीचे आपल्या शरीराला सुद्धा अनेक फायदे आहेत.
केसांच्या उत्तम आरोग्यासाठी ‘या’ पानांची पेस्ट आहे खूप गरजेची, वाचा
कोथिंबीरीचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे
डाळींमध्ये किंवा भाज्यांमध्ये असणारी कोथिंबीर पचनाच्या समस्या दूर करते. कोथिंबीर मध्ये फायबर असल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो .
कोथिंबीर डायबिटीजच्या रुग्णांसाठी शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. कोथिंबीरच्या सेवनाने इन्सुलिन नियंत्रणात राहते. हा उपाय आयुर्वेदही सांगतो. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांच्या आहारामध्ये कोथिंबीर असायलाच हवी.
कोलेस्ट्रॅाल कमी करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर असते. कोथिंबीरीत असणाऱ्या गुणधर्मामुळे कोलेस्ट्रॅालची पातळी कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॅाल असणाऱ्यांनी कोथिंबीरीची चटणी किंवा धन्याचं पाणी उकळून प्यायल्याने कोलेस्ट्रॅालची पातळी नियंत्रणात येते.
एनिमिया असणाऱ्यांनी आहारात कोथिंबीरचे सेवन करावे. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातली रक्तपातळी वाढते. कोथिंबीरमध्ये एंटीऑक्सीडेंटस्, मिनरल, व्हिटामीन ए ची मात्रा मुबलक प्रमाणात असल्याने एनिमियाचा त्रास कमी होण्यास मदत होते.