
पावसाळ्यात त्वचेवर ऍलर्जी, पुरळ, खाज आणि बुरशीजन्य संसर्गाची समस्या खूप वाढते. त्वचेवर ओलावा, घाम आणि घाण जमा झाल्यामुळे असे होते. खरं तर, पावसाळ्यात हवेत भरपूर ओलावा असतो. त्यामुळे त्वचेवर बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढू लागतात आणि त्वचेशी संबंधित समस्या सुरू होतात. या समस्या टाळण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. या ऋतूत बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवणे फायदेशीर ठरू शकते. हा एक प्रकारचा चेहऱ्याचा व्यायाम आहे जो योग्यरित्या केल्यास त्वचेला आश्चर्यकारक फायदे देतो. बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याचे खूप सारे फायदे आहेत.
बर्फाच्या पाण्यात चेहरा कसा बुडवायचा?
बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्यासाठी, एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे घाला. नंतर काही सेकंदांसाठी तुमचा चेहरा त्या भांड्यात बुडवा. थोडा वेळ बुडवल्यानंतर, चेहरा बाहेर काढा आणि हे 4 ते 5 वेळा करा. शेवटी स्वच्छ टॉवेलने हलकेच थापून तुमचा चेहरा कोरडा करा.
Skin Care – चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी ‘हा’ फेसमास्क आहे सर्वात उत्तम, वाचा
बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याचे फायदे
बर्फाच्या पाण्यात चेहरा घातल्याने, चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच डोळ्यांभोवती आलेली सूज कमी करण्यासाठी अनेकजण बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवणे पसंत करतात.
चेहऱ्यावरील रंध्रे घट्ट होण्यासाठी, बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवायला हवा. यामुळे त्वचा देखील गुळगुळीत होण्यास मदत मिळते.
बर्फाच्या पाण्यात चेहरा घातल्याने, चेहऱ्याचा रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे त्वचेला चमक मिळते.
मेकअप करण्यापूर्वी बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवल्याने मेकअप अधिक खुलून दिसतो. तसेच त्यामुळे मेकअप जास्त काळ टिकण्यासही मदत होते.
बर्फाच्या पाण्यामुळे, चेहऱ्यावरील लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यास मदत होते. सनबर्न सारख्या समस्यांसाठी हे खूपच फायदेशीर आहे.
थंड पाण्यात चेहरा बुडवल्याने त्वचा घट्ट होण्यास मदत होते.