Monsoon Makeup- पावसाळ्यात मॅट लिपस्टिकचा वापर करण्याचे फायदे

आपला मेकअप हा सीझनप्रमाणे बदलतो. म्हणूनच पावसाळ्यात मेकअप प्रोडक्टस् घेतानाही आपण सजग असायला हवं. पावसाळ्यात लिपस्टिक जाऊ नये म्हणून मॅट लिपस्टिकचा पर्याय हा सर्वात बेस्ट मानला जातो. लिपस्टिक हा महिलांच्या रोजच्या वापरातलं प्रोडक्ट. परंतु लिपस्टिक विकत घेताना, आपण काय लक्षात ठेवायला हवं हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. मॅट लिपस्टिक सहसा लवकर जात नाही, त्यामुळेच पावसाळ्यात मॅट लिपस्टिक लावण्याचे खूप फायदे आहेत. मूळात दिवसभर लिपस्टिक आपल्या ओठावर राहते. तसेच पावसाचे थेंब चेहऱ्यावर उडाले तरी, लिपस्टिक लवकर जात नाही.

सध्याच्या घडीला मॅट लिपस्टिकची चलती ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. कामावर जाताना किंवा दिवसभर बाहेर राहताना मॅट लिपस्टिक का एक उत्तम पर्याय आहे. म्हणूनच मॅट लिपस्टिकला सर्व वयोगटातील महिलांची पसंती ही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. मॅट लिपस्टिक ही एखाद्या लग्नसोहळ्यापासून ते अगदी कार्यालयात जाताना लावण्यासाठी एक उत्तम पर्याय मानला जात आहे. वापरण्यास सुलभ असल्यामुळे मॅट लिपस्टिकला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

मॅट लिपस्टिक घेताना काय लक्षात ठेवाल?

मॅट लिपस्टिक विकत घेताना, ती कोणत्या कंपनीची आहे हे जितके महत्त्वाचे आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे ती किती काळ ओठावर टिकून राहील याची माहितीही घ्यायलाच हवी.

 

मॅट लिपस्टिकमध्ये शेड निवडताना, आपल्या स्किन कलरपेक्षा डार्क शेड निवडणं हा एक उत्तम पर्याय आहे.

 

मॅट लिपस्टिकमध्ये न्यूड शेडस् येतात, त्या शेडस् फार उठावदार नसतात. म्हणूनच मॅटमध्ये न्यूड शेडस् घेणे टाळावे.

 

ही दीर्घकाळ टिकत असल्यामुळे, वारंवार टचअप करण्याची गरज राहात नाही हा या लिपस्टिकचा मुख्य गुणधर्म मानला जातो.

 

मॅट लिपस्टिकमुळे आपल्या ओठांनाही ट्रेंडी आणि उठावदार असा मस्त लूक मिळतो.

आता आपण बघूया मॅट लिपस्टिक लावण्याचे काय आहेत फायदे

इतर लिपस्टिक लावल्यानंतर पसरण्याची भीती असते, हे मात्र मॅट लिपस्टिकच्या बाबतीत होत नाही. मॅट लिपस्टिक ही पसरत तर नाहीच. शिवाय ही वाॅटरप्रुफ असल्यामुळे, घाम आल्यावरही ही लिपस्टिक सहसा जात नाही.

मॅट लिपस्टिक कशी लावावी?
मॅट लिपस्टिक लावताना ओठांना सर्वात आधी लिप पेन्सिलने साईड बाॅर्डर काढून घ्यावी.

ही बाॅर्डर काढून झाल्यानंतर, त्यामध्ये बाॅर्डरच्या बाहेर न जाता आतमधल्या भागात मॅट लिपस्टिक लावावी.

ओठांच्या बाहेर चुकून ही लिपस्टिक लागल्यास, टिशू ओला करून अलगदपणे ही लिपस्टिक पुसावी.