
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसर्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. बंगालमधील 30 आणि आसाममधील 39 जागांवर मतदान होत आहे.
गुरुवारी सकाळपासूनच बंगालमधील वेगवेगळ्या भागातून हिंसाचार झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. तर ममता बॅनर्जी मतदान केंद्रावर पाहणीसाठी व्हील चेअरवर पोहोचल्या होत्या.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या, नंदीग्राममध्ये भाजप जिंकणार नाही. नंदीग्राममध्ये आम्हाला 90 टक्के मते मिळाली आहेत. त्या म्हणाल्या, मतदानाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी रॅली कशी काय करू शकतात. हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही का? निवडणूक आयोग काय करत आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.




























































