Video – कपडे काढून… माथेफिरू महिलेची महिला पोलिसाला भररस्त्यात धमकी

भररस्त्यात महिला ट्राफिक पोलिसांना घाणेरड्या शिव्या देत त्यांना अभद्र धमक्या दिल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. सदर महिलेचा पोलिसांसोबतचा भांडतानाचा धक्कदायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये सदर महिला ही एका पुरुषासोबत बाईक रस्त्याच्या कडेला घेऊन उभी होती. तिच्यासमोर उभ्या असलेल्या तीन ट्राफिक पोलिसांसोबत तिचा वाद सुरू होता. यावेळी पोलीस तिला समजवायचा प्रयत्न करत असताना तिने त्यांना अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या व अश्लील टिपण्णीही केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.