सुनील जोशी फिरकी गोलंदाज प्रशिक्षकाच्या शर्यतीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। बंगळुरू 

माजी डावखुरा फलंदाज सुनील जोशी याने हिंदुस्थानच्या फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. हिंदुस्थानी संघातील फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शकाची गरज आहे. त्यासाठी मी अर्ज केला आहे, असे सुनील जोशी यावेळी म्हणाला.

परदेशी प्रशिक्षक नको

प्रशासकीय समितीने टीम इंडियाचा कोच निवडण्याची जबाबदारी कपिल देव, अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीकडे सोपवली आहे. ही त्रिसदस्यीय समिती हिंदुस्थानी प्रशिक्षकाच्या नियुक्तीवर ठाम आहे. त्यांना परदेशी प्रशिक्षक नकोय. याचाच अर्थ रवी शास्त्रीच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार हे निश्चित झाले आहे.