बेस्टच आहे! अॅपवरूनही विजेसंबंधीच्या तक्रारी करा

best_undertaking_logo

पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे तसेच अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने वीज पुरवठय़ासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी बेस्टचे फ्यूज कंट्रोल सेंटर 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत. तसेच ( mibest ) मोबाईल अॅपवरूनही वीज ग्राहकांना वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार करता येणार आहे.

‘फ्यूज कंट्रोल सेंटर’मध्ये तक्रार नोंदवताना ग्राहकांनी त्यांचा वीज ग्राहक क्रमांक अथवा वीज मापक (मीटर) क्रमांक नोंदवावा. फ्यूज कंट्रोल सेंटरचे दूरध्वनी क्रमांक वीज देयकावर छापलेले आहेत. तसेच ( mibest ) मोबाईल अॅपवरूनही वीज ग्राहकांना आपल्या वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी नोंदवता येतील. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून स्मार्ट फोनवर डाऊनलोड करता येते असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या