बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बस चालकांचे काम बंद आंदोलन, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाने भाडेतत्वावर घेतलेल्या खाजगी बसेसच्या कंत्राटी बस चालकांनी पगारी कपातीसह अन्य पिळवणुकीविरोधात अचानक काम बंद आंदोलन केल्याने कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांचे शुक्रवारी सकाळी प्रचंड हाल झाले. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित बस चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

बेस्टच्या ताफ्यात सध्या वेटलिजेसच्या म्हणजेच भाडेतत्वावरील बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या बसेसच्या चालकांची नियुक्ती खाजगी पंपन्यांमार्फत करण्यात आली आहे. या बसेसच्या खासगी चालकांनी वर्षभर कमी वेतनात काम करावे लागत असल्याचा आरोप करीत शक्रुवारी सकाळी अचानक वडाळा, वांद्रे आणि कुलाबा आगारात उत्स्फुर्तपणे काम बंद आंदोलन पुकारले.

त्यामुळे सकाळी ऐनगर्दीच्या वेळी एसी बसेस तसेच मिनी बसेसच्या फेर्या बंद पडल्या. भाडेतत्वावरील 121 बसेस आज रस्त्यांवर उतरल्या नसल्याने अत्यावश्यक सेवेतील कामगारांना त्याचा फटका बसला. त्यामुळे बस थांब्यावर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे प्रवाशांना टॅक्सी तसेच खाजगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागला.